New Crop Insurance :सुधारित पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम, २०२५ मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि.१४.०८.२०२५ पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दि.३०.०८.२०२५ पर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देणेबाबत.
१. कृषी व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. प्रपियो-२०२५/प्र.क्र.६६/११-अ, दि.०९.०५.२०२५
२. कृषी व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. प्रपियो-२०२५/प्र.क्र.६६/११-ओ, दि.२४.०६.२०२५
३. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. १८०११/०२/२०२३-क्रे-॥-पार्ट (४) (एफटीएस-१६९७३१), दि.०१.०८.२०२५
शासनाचे पुरावेपत्र :-
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सुधारित पीक विमा योजना, खरीप हंगाम २०२५ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पीकांसाठी, राज्यात राबविण्यास, दि.२४.०६.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ करिता सहभागाची अंतिम मुदत दि.३१.०७.२०२५ अशी निश्चित करण्यात आलेली होती. तथापि, शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, केंद्र शासनाने, संदर्भ क्र. (३) येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५ मध्ये ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास बिगर कर्जदार शेतकऱ्यांना, दि. १४.०८.२०२५ पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दि.३०.०८.२०२५ पर्यंत, मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र या वाढीव मुदतीत योजनेच्या कार्यान्वयनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतूदींचे काटेकोर पालन करुन अंमलबजावणीतील नैतिक धोके, तसेच लाभार्थ्यांच्या चुकीच्या निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी. सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिध्दी व प्रचार मोहिम राबवावी.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
२. सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०८०४१८२६१९११०१ असा आहे. हे पूरकपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.