Navin Vihir Yojana Pepar : नवीन विहीर योजनेकरीता कोणती कागदपत्रे लागतात, पहा संपूर्ण डाकुमेंट्सची यादी
Navin Vihir Yojana : राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.
Navin Vihir Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी विहिरींसाठी विविध योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये मागेल त्याला विहीर योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनांच्या माध्यमातून विहिरीच्या योजना राबवल्या जातात. त्यापैकी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजनेतील विहीर योजनेबाबतच्या कागदपत्रांसंदर्भात माहिती घेऊयात…
तर जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेकरिता पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.
नवीन विहीरीकरीता आवश्यक कागदपत्रे
१) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
२) सातबारा व आठ अ चा उतारा
३) उत्पन्न प्रमाणपत्र.
४) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र. (१०० रुपये स्टॅम्प पेपर)
५) अपंग असल्यास प्रमाणपत्र
६) तलाठी यांच्याकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
७) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
८) कृषि अधिकारी यांची क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
१०) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे, त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
११) ग्रामसभेचा ठराव.