विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी नगरपरिषदांमधील गट क, गट ड पदभरती.Nagarparishd Recruitment 2026

Nagarparishd Recruitment 2026:राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील गट-क आणि गट-डच्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असतानाही रखडली आहे. त्यामुळे टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत संबंधित भरतीप्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी राज्यातील नगरपालिकांच्या विभागीय सहआयुक्तांना दिले आहेत.

गोसावी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सामान्य प्रशासनाच्या शासननिर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून, जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील

टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत होणार पदभरती

नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टी.सी.एस. आय.ओ.एन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरांवर दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी, असे नमूद केले आहे.

सरळ सेवेद्वारे गट-क व गट-डच्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, सरळसेवा पदभरतीबाबत रूपरेषा, वेळा-पत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

परंतु सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी शासनाकडून निवडलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही किंवा जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही, असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोमवारी याबाबत सोमवारी ( दि.१२) आढावा बैठक आयोजित करून त्यात भरतीप्रक्रियेची पुढील दिशा ठरविण्यात आली.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment