Municipal Corporation 2025:कोल्हापूर महापालिकेसह राज्यभरातील २८ महापालिकांमध्ये मोठी नोकरभरती राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण रिक्त ४८,६८० पदांपैकी विविध प्रकारच्या २२,३८१ पदांवर भरती होणार हे जवळजवळ निश्चित आहे. यामध्ये ब, क, ड वर्गातील पदांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. राज्यासह केंद्र शासनाकडून करण्यात येणाऱ्या भरतीसाठी हे परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. गेल्या दोन वर्षांत शासनाकडून हजारो पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून, या काळात सर्वाधिक संधी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. आता महाराष्ट्र शासनाकडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, त्यासाठी ५ महिन्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले
कोल्हापूर महापालिकेत फक्त १८२ पदे
कोल्हापूर महापालिकेत रिक्त पदे १३७४ असून, त्यापैकी फक्त १८२ पदेच भरली जाणार आहेत. महापालिकेत बहुतांश महत्त्वाची पदे अद्यापही रिक्तच आहेत. परिणामी, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. एकूण रिक्त पदांपैकी किमान ५० टक्के पदे या टप्प्यात भरली गेली असती, तर कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा अतिरिक्त ताण कमी झाला असता.
सर्व महत्त्वाची माहिती येथे क्लिक करून पहा
आहे. यामध्ये महापालिकेतील २२,३८१ पदांचा समावेश आहे. रिक्त पदांपैकी ४५ टक्के पदांची भरती केली जाणार असून,त्यासंदर्भातील माहिती संबंधित विभागाकडून संकलित करण्यात आली आहे.
आगामी काळात ५ महिन्यांमध्ये हजारो पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने पोलीस, वनरक्षक, वनसेवक, आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद यासह विविध विभागांचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्य शासनाकडून महापालिकेतील रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली आहे.
यामध्ये १ लाख २० हजार ५६६ मंजूर पदे असून, त्यापैकी ६६,४९६ पदे भरली आहेत, तर रिक्त ४८,६८० पदांपैकी २२,३८१ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरळसेवा, एमपीएससी परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करत असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने पुन्हा एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा