मुंबई लोकलमध्ये पुन्हा भाषा वरून वाद, सीटवर पाय ठेवला म्हणून मारहाण केली… पाहा VIDEO.Mumbai local viral video

Mumbai local viral video: मुंबई लोकल म्हणजे फक्त रोजचा प्रवास नाही, तर अनेक लोकांचा संयम आणि शिस्त कशी आहे हेही तिथे दिसून येतं. गर्दी जास्त असली की छोट्याशा गोष्टीवरूनही वाद होऊ शकतो. असाच एक प्रकार मुंबई लोकलमध्ये घडला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरतो आहे. या व्हिडीओमुळे सार्वजनिक ठिकाणी नेमकं कसं वागायला हवं यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

हा व्हायरल व्हिडीओ मुंबई लोकल ट्रेनमधील आहे. एका प्रवाशाने ट्रेनमधील सीटवर पाय ठेवले होते, याच गोष्टीवरून एका मराठी भाषिक प्रवाशाचा संताप अनावर झाला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. व्हिडीओमध्ये मराठी भाषिक प्रवासी मोठ्या आवाजात समोरच्या प्रवाशाला जाब विचारताना दिसतो.

मोठी बातमी दोन दिवसात हे कागदपत्रे जमा करा! तरच अनुदान मिळणार Farmer’s Benifit Document

“पाय ठेवायची जागा आहे का ती?” असा प्रश्न करत तो प्रवाशाला शिस्तीचा धडा देण्याचा प्रयत्न करतो. वाद वाढत जातो, आवाज चढतो आणि क्षणभरातच तो प्रवासी समोरच्या व्यक्तीला चापट मारतो. यानंतर शिवीगाळही होत असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतं. त्या प्रवाशाकडून माफी मागण्याची मागणीही केली जाते.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ ‘Lit Memes Mumbai’ नावाच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला असून, पाहता पाहता तो हजारो लोकांपर्यंत पोहोचला. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी सीटवर पाय ठेवणं चुकीचं असल्याचं मान्य केलं, मात्र मारहाणीचा तीव्र निषेध केला. एका युजरने लिहिलं, “स्वच्छता शिकवणं ठीक आहे, पण हात उचलणं कोणत्याही कायद्यात बसत नाही.”

तर दुसऱ्याने म्हटलं, “हा राग स्वतःच्या फ्रस्ट्रेशनचा आहे.” काही युजर्सनी या घटनेला प्रादेशिक वळण देत, समोरचा प्रवासी उत्तर भारतीय असावा असा अंदाज लावला आणि त्यावरून मराठी-परप्रांतीय वादही रंगवला. काही लोकांनी मराठी प्रवाशाचं समर्थन करत, “असंच वागणं गरजेचं आहे, तेच ‘सिस्टम रिस्टार्ट’ आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी 02 जानेवारी 2026 रोजीचे 04 महत्त्वाचे शासन निर्णय.State Employees Shasan Nirnay GR

ही घटना पुन्हा एकदा एक प्रश्न उभा करते, सार्वजनिक शिस्त शिकवण्याचा अधिकार कोणाला आणि कितपत? चूक दाखवणं गरजेचं असलं तरी हिंसा योग्य ठरू शकते का? मुंबईसारख्या शहरात दररोज अशा असंख्य घटना घडतात, पण संयम आणि संवाद हाच खरा उपाय असल्याचं अनेकांनी अधोरेखित केलं आहे.

Leave a Comment