मुंबई इंडियन्सने धक्का दिला, 9 खेळाडूंना टीमबाहेर केलं, शोधलेला ‘हिरा’ही सोडला! नवीन संपूर्ण संघ पहाMumbai Indians New Tim 2025

Mumbai Indians New Tim 2025:आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सने तब्बल 9 खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आयपीएल 2026 च्या लिलावाआधी खेळाडूंना रिलीज आणि रिटेन करण्याचा 15 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे मुंबईने त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

मुंबईने 9 खेळाडू सोडल्यामुळे त्यांच्याकडे आता 2.75 कोटी रुपयांची पर्स आहे. आयपीएल लिलावात मुंबई जास्तीत जास्त 5 खेळाडू विकत घेऊ शकते, ज्यात जास्तीत जास्त एक परदेशी खेळाडू असेल.

हायकोर्टाचा घटस्फोटीत पतीला दणका; पोटगीची रक्कम 7 पटीने वाढवली, दरमहा 3.5 लाख देण्याचे निर्देश.Divorce Case New Update

मुंबई इंडियन्सने त्यांच्या 9 खेळाडूंना सोडलं असलं, तरी त्यांची कोअर टीम कायम आहे. आयपीएल ट्रेडमध्ये मुंबईने शार्दुल ठाकूर आणि शरफेन रदरफोर्डला टीममध्ये घेतलं आहे.

मुंबईने कुणाला सोडलं?

सत्यनारायण राजू (३० लाख)

रीस टोली (७५ लाख)

के श्रीजित (३० लाख)

कर्ण शर्मा (५० लाख)

अर्जुन तेंडुलकर (30 लाख)

बेवन जेकब्स (३० लाख)

मुजीब उर रहमान (2 कोटी)

लिझार्ड विलियम्स (७५ लाख)

विघ्नेश पुथ्थुर (३० लाख)

मोठी बातमी : जि.प. आचारसंहिता १५ किंवा १६ नोव्हेंबरला. ZP Election update 2025

मुंबईने विघ्नेश पुथ्थुरला रिलीज केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या विघ्नेश पुथ्थुरला मुंबईने शोधलं होतं, त्यानंतर पहिल्याच सामन्यात विघ्नेशने चमकदार कामगिरी केली होती, पण एका मोसमामध्येच मुंबईने विघ्नेशला रिलीज केलं आहे.

मुंबईच्या टीममध्ये आता कोण उरलं ?

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, जॉन बेअरस्टो, तिलक वर्मा, हार्दिक पांडा, नमन धीर, मिचेल सॅन्टनर, राज अंगद बावा, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, अश्विनी कुमार, रघू शर्मा, जसप्रीत बुमराह

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment