मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नविन पदभरती; लगेच करा अर्ज!Mumbai High Court Recruitment 2025

Mumbai High Court Recruitment 2025:मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नविन पदभरती; लगेच करा अर्ज!

मुंबई उच्च न्यायालयामध्ये नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे स्वीय सहाय्यक (Personal Assistant) या पदासाठी एकूण 36 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

जाहिरात येथे पहा

शैक्षणिक अर्हता

उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे शॉर्टहॅण्ड 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग 50 शब्द प्रति मिनिट या गतीने काम करण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची शिथिलता दिली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया

पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://bhc.gov.in/bhcparecruit2025/ येथे अर्ज भरता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 01 सप्टेंबर 2025 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

Leave a Comment