MSRTC Recruitment 2025: एसटी महामंडळात सद्यस्थितीत ८६,५६२ कर्मचारी कार्यरत आहेत. यात वर्ग १, २, ३, ४ अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे; परंतु शासन मंजूर १ लाख २५ हजार ८१४ कर्मचारी असताना आजतागायत २९ हजार ३६१ पदे रिक्त आहेत.
याचा एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
यासोबत पदोन्नती व सेवाज्येष्ठता न मिळाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असून नियोजनाचा अभाव असल्याने ही पदे अद्याप रिक्त असून यासाठी कर्मचारी वर्ग खात्यांचे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पदच रिक्त
महामंडळात अनेक विभागांत विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी हे पदच रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे.
हा विभाग पातळीवरील मुख्य प्रशासनात महत्त्वाचा घटक अधिकारी असल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे. कर्मचाऱ्यांची पद बढती, वेतन निश्चिती, वेतन बढती, रजा इत्यादी बाबत अनेक तक्रारी होत आहेत. कामगार
एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.
एसटी महामंडळात दरवर्षी सेवाज्येष्ठता यादी प्रसारित केली जात नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे पदोन्नती न मिळाल्याने लाखोंचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी ही पदे सुद्धा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय, नीट नियोजन न केल्याने अनेक विभागांत वाहन परीक्षक, सहाय्यक कारागीर, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक अधीक्षक अशी अनेक पदे भरण्यात आलेली नाहीत.
आहे. २०१९ नंतर अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसारित करण्यात आलेली नाही. २०१९ च्या सेवाज्येष्ठता यादीवर २०२२-२०२३ या कालावधीमध्ये एकूण आठ वेळा डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची (डीपीसी) बैठक घेण्यात आली आहे.
अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक खूप नुकसान होत आहे. महामंडळाची देखील आर्थिक गणिते कोलमडतात. प्रवाशांना दर्जेदार, चांगल्या सुविधा देण्यास अडचणी येत आहेत. – संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना
अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवाज्येष्ठता मिळाली नसल्याने कर्मचारी वर्गाचे प्रचंड आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे. -श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा