MSRTC NCMC Card Online Apply:२३ फेब्रुवारी २०२६) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू केली आहे.
सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलत धारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड घ्यावीत असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकल्पामुळे साध्य होणार असून, या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे.
कोणाला मिळणार NCMC कार्ड?
या नव्या योजनेत समाजातील विविध सवलती धारक घटकांचा समावेश करण्यात आला आहे:
विद्यार्थीः शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक व महिलाः अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.
पुरस्कारार्थी व पत्रकारः स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना मुख्यालय, विभागीय कार्यालय, आगारा मार्फत वितरण.
कार्डची वैशिष्ट्ये – प्रवासात स्मार्ट सोय
१) किंमतः नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.
२) वॉलेट मर्यादाः किमान १०० रुपये ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.
३) रिचार्ज सुविधाः ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा