MSRTC Bus Ticket Rate: महाराष्ट्रामध्ये एसटी बस सेवा सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या दरात १५% सूट मिळणार आहे. ही योजना १ सप्टेंबर झाली आहे.
सवलत कोणाला मिळणार?
ही सवलत दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता वर्षभर लागू असणार आहे. पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना लागू आहे. सवलतधारक प्रवाशांना (उदा. ज्येष्ठ नागरिक) याचा लाभ मिळणार नाही.
सूट: तिकीट दरात १५% सूट.
प्रवासाचे अंतर: १५० कि.मी.पेक्षा जास्त.
सवलतीचा हंगाम: दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता वर्षभर.
या योजनेचा फायदा गणपती उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या भाविकांना आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना देखील घेता येईल.
तिकीट बुकिंगसाठी पर्याय
प्रवासी खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने तिकीट बुकिंग करून या सवलतीचा लाभ घेऊ शकतात:
तिकीट खिडकीवर: थेट तिकीट खिडकीवर जाऊन.
ऑनलाइन पोर्टल: एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर (public.msrtcors.com).
मोबाइल ॲप: MSRTC Bus Reservation ॲपद्वारे.
ई-शिवनेरी बस मुंबई-पुणे मार्गावरील प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसच्या प्रवाशांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
‘एनसीएमसी कार्ड’ची नवीन सुविधा
एसटी महामंडळ डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे. लवकरच केंद्र सरकारच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) योजनेनुसार एसटीची तिकीट प्रणाली या कार्डसोबत जोडली जाईल.
एनसीएमसी कार्ड म्हणजे काय?
हे एक युनिफाइड डिजिटल पेमेंट कार्ड आहे.
या कार्डचा वापर मेट्रो, लोकल आणि आता एसटी अशा विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट खरेदी करण्यासाठी करता येईल.
हे कार्ड NFC तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे रिअल-टाइम आणि ऑफलाइन व्यवहार सोपे होतात.
यामुळे प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास वाचणार आहे.