MPSC Recruitment New Update:महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अन्वये राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत, पदसंख्या व आरक्षण नमूद करुन सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून संदर्भाधीन जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
आयोगाकडून जाहिराती प्रसिध्द झाल्यानंतर संदर्भिय दिनांक २० डिसेंबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
२. प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरुन विहित कमाल वयोमर्यादमध्ये एक वर्षांची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे:-
अ.क्र.जाहिरात क्रमांक
०४८/२०२४
०४९/२०२४
परीक्षा / जाहिरात
2 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
२ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
३. उपरोक्त जाहिरातीस अनुसरून विहित पध्दतीने अर्ज सादर करण्यास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे:-
(१) अर्ज सादर करण्याचा दिनांक २६ डिसेंबर, २०२४ दुपारी १४.०० ते दिनांक ०६ जानेवारी, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यन्त
( २) ऑनलाईन परिक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक ०६ जानेवारी, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यप्त
( ३) भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक ०८ जानेवारी, २०२५
(४) चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०९ जानेवारी, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत.
(५) प्रस्तुत शुध्दीपत्रकास अनुसरुन महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करीता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रांवरील परीक्षा उपकेंद्रांवर प्रवेश देण्यात येईल.
४. उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याच्या विहित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करुन द्यावा लागणारा कालावधी, नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचा कार्यक्रम, इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्व परीक्षांचा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे राहील:-
अ.क्र.जाहिरात क्रमांक
२ ०४९/२०२४
०४८/२०२४
परीक्षा / जाहिरात
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४
परीक्षांचा सुधारित दिनांक
दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२५
दिनांक ०४. २०२५
५. संबंधित मूळ जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
उप सचिव (जाहिरात).ठिकाण : नवी मुंबई
