लाडकी बहीण योजनेची अशी करा eKYC घर बसल्या, मोबाईल मधून, नाहीतर 1,500 रू बंद.majhi ladki bahin ekyc process

majhi ladki bahin ekyc process:महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. मात्र, काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी अनिवार्य केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच या ई-केवायसीसाठी दोन महिन्यांची मुदत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे ?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळणार, सरकार 3 टक्के महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता, पगार किती रुपये वाढणार? DA Hike 2025

पुढे बोलताना, “ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभमिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे”, असंही त्या म्हणाल्या.

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

कशी करायची ई-केवायसी प्रोसेस ?

ई-केवायसी ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. यासाठी काही कागदपत्रे, महत्त्वाची माहिती पुन्हा अपलोड करावी लागणार आहे. याची प्रक्रियाही सुरु झाली आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड अशी सर्व माहिती भरायची आहे. तसेच या कागदपत्रांची छायांकित प्रतही अपलडो करायची आहे. त्यानंतर तुमची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

डिजिटल स्वाक्षरी असलेले दस्त घरबसल्या मिळणार ई-सर्च, ‘आपले सरकार’वर सुविधा; प्रायोगिक तत्त्वावर साताऱ्यापासून सुरुवात Land Record Online

ई-केवायसी न केल्यास काय होईल ?

जर तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया नाही केली, तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. लाडकी बहीण योजनेत जर केवायसी केले नाही तर तुम्हाला १५०० रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे लवकर शक्य तितक्या लवकर ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

E KYC करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment