महिला व बाल विकास विभागात गट-क च्या ‘या’ पदाची भरती जाहीर Mahila Balvikas Bharti 2025
Mahila Balvikas Bharti 2025:महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, पुणे येथे संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क या पदांची भरती जाहीर झाली आहे. महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या या महत्वपूर्ण विभागात नोकरीची संधी मिळणे ही मोठी संधी मानली जाते. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही भरती प्रक्रिया आचारसंहितेच्या काळातही सुरू करण्यात आली आहे.
पदाचे नाव :
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) – Protection Officer (Junior), गट-C
एकूण रिक्त पदे :
१७ जागा
वेतनश्रेणी :
एस-१५ : ₹41,800 ते ₹1,32,300 (सातव्या वेतन आयोगानुसार). या वेतनश्रेणीत महत्त्वाचे भत्ते देखील लागू होतात, त्यामुळे उमेदवारांना आकर्षक मासिक उत्पन्न मिळू शकते.
अर्ज पद्धत :
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारांनी योग्य कागदपत्रे आणि तपशीलांसह ऑनलाईन फॉर्म भरावा.
अर्ज करण्यास सुरुवात :
८ डिसेंबर २०२५ (दुपारी ३:०० वाजता)
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
२२ डिसेंबर २०२५ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत)
अधिकृत संकेतस्थळ :
याच संकेतस्थळावरून अर्ज लिंक, सूचना पुस्तिका, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण नियम, परीक्षा पद्धत इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होईल.