राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात वाढीव पगार ; जाणून घ्या शिक्षण मंत्र्याचे निर्णय ! Maharashtra Teacher Salary Hike

Maharashtra Teacher Salary Hike:यंदा राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदान येथे अनुदान टप्पा वाढीसाठी आंदोलन सुरु होते , सदर आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारकडून माहे ऑगस्ट महिन्यांच्या पगारात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे .

सध्या राज्यात 49,562 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदानावर कार्यरत आहेत . सदर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट महिन्यांपासुन 20 टक्के टप्पा वाढ करण्याची ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे .

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अंतिम वेतन प्रणापत्राच्या नमुन्यात सुधारणा ; GR निर्गमित दि.25.07.2025.Amendment in the final pay slip template

याकरीता शिक्षण विभागाने वित्त विभागांकडून 1400 कोटी रुपये इतक्या रक्कमेची मागणी करण्यात आलेली आहे . सदर निधी प्राप्ती नंतर राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढीचा लाभ दिला जाणार आहे .

ज्या शाळा 1999 सालापासुन 60 ते 80 टक्के अनुदानावरच कार्यरत आहेत , अशा शाळांना आता पुर्ण अनुदानावर करण्यात येणार आहेत . सदर अनुदान वाढ ही माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत मिळणार आहे .

ऑगस्‍ट पेड इन सप्टेंबर वेतनासोबत 20 टक्के टप्पा वाढ : माहे ऑगस्ट महिन्यांच्या वेतनासोबत टप्पा अनुदानावरील शाळांना 20 टकके वाढीव अनुदान देण्यात येणार आहे . शासन निर्णयानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment