राज्यात १५,१५८ रिक्त शिक्षक पदांची मेगा भरती! शिक्षकांची बदली ऑनलाइन पद्धतीनेच.Maharashtra Teacher Recruitment 2026

Maharashtra Teacher Recruitment 2026:राज्यातील काही जिल्हा परिषद शाळांची स्थिती खराब असली तरी अनेक शाळांचा दर्जा उत्तम आहे. तेथे प्रवेशासाठी गर्दी होत आहे, असा दावा करताना राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये १५,१५८ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची कबुली ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

राज्यातील जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेविषयी आणि रिक्त पदांच्या स्थितीवर प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने राज्यातील सुमारे ६०० शाळा बंद पडण्याची शक्यता असल्याची चिंता सदस्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी शिक्षकांची एकूण पदे किती, रिक्त पदे किती आणि ती कधी भरण्यात येणार याबाबत प्रश्न विचारला.

गॅसवर नारळ ठेवताच कमाल झाली; मोठ्या समस्येवर उपाय, काय ते VIDEO मध्ये पाहाच Kitchen jugad video

बदली प्रक्रिया पूर्ण

२०२५ सालासाठीची बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून यंदा एकूण ६६, ५२० शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात विशेष संवर्ग-१ मधील ५०४, विशेष संवर्ग-२ मधील ४,५८८, तसेच बदली अधिकार असलेल्या ४,८६१ सामान्य शिक्षकांचा समावेश आहे.

आकडेवारीत विसंगती कशी?

मंत्री गोरे म्हणाले की, राज्यात एकूण १९,९०३ शिक्षकांची पदे मंजूर असून सध्या १७,६१४ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे १५,१५८ पदे रिक्त आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यावर वडेट्टीवार यांनी

‘मे अखेरपर्यंत प्रक्रिया’

बदली प्रक्रिया योग्यप्रकारे राबवण्यात येत असल्याने तालुका शेजारील गावात शिक्षण अधिक आणि तालुकापासून दूरची गावांना शिक्षक कमी असे असमतोल झाल्याचा मुद्दा भाजपचे सुमीत वानखेडे यांनी उपस्थित केला.

मतदार यादीत नाव कसे नोंदवता येते? काय आहे प्रक्रिया? कोणती कागदपत्रे आवश्यक? Voter Registration Process in Marathi

तसेच काही सदस्यांनी बदली प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत चालते याकडे लक्ष वेधून ही प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली. यावर सरकारने सहमती दर्शवित मेअखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

गेल्या अधिवेशनात ३७ हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले होते. आता ती १५ हजार सांगितली जात आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तसेच जिल्हानिहाय रिक्त पदांची आकडेवारी देण्याची मागणी केली. त्यावर मंत्र्यांनी ती पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment