Maharashtra Star Pracharak Yadi 2025:भाजपाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाचा समावेश?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुलरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.
MahaDBT Anudan 2025 : आचारसंहितेत महाडीबीटीवरील योजनांचे अनुदान मिळणार की नाही, वाचा सविस्तर
राज्यात काही ठिकाणी भाजपा महायुतीत लढणार
समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात काही ठिकाणी भाजपा ही निवडणूक महायुतीमध्ये लढणार आहे, तर काही ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे. सध्याचं राजकीय वतावरण पहाता सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, कारण यानंतर आता लगेच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं होतं, त्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार हे देखील पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतरं वेगाने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतराला देखील वेग आला आहे, महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेते भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत, यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती, मात्र या नाराजीनंतर देखील भाजपात होणारे पक्ष प्रवेश सुरु आहेत.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
