Maharashtra Municipal Council Recruitment 2026:राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांचा मोठा आकडा समोर आला असून, एकूण ३२३८ पदे रिक्त असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयांकडून प्राप्त झाली आहे. या रिक्त पदांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गट-कमधील २५५१ पदे, तर गट-डमधील ६८७ पदे रिक्त आहेत. विभागनिहाय पाहता औरंगाबाद विभागात सर्वाधिक ११९८ पदे रिक्त असून यात गट-कची ६३१ व गट-डची ५६७ पदे आहेत. तसेच, पुणे विभागात ४२२, अमरावती विभागात ४६७, नागपूर विभागात ४४०, कोकण विभागात २००,
जिल्हानिहाय नगरपरिषद, नगरपंचायतीचे रिक्त पदे
जिल्हानिहाय आकडेवारीत उस्मानाबाद (४४९), नांदेड (२२३), बीड (१५७), जळगाव (१२४), यवतमाळ (१४९), चंद्रपूर (८४), अमरावती (१००), अकोला (७५), वाशिम (४९), बुलढाणा (११४), धुळे (२९), अहमदनगर (१३२), नाशिक (८३), नंदूरबार (१२४), औरंगाबाद (९१), परभणी (७६), जालना (७१), पालाघर (५१), रत्नागिरी (३५), ठाणे (३६), रायगड (४९), सिंधूदुर्ग (२९), कोल्हापूर (४३), सोलापूर (९५), सांगली (९९), सातारा (१२१), पूणे (५४), नागपूर (१२९), वर्धा (८२), भंडारा (४३), गोंदिया (३९), गडचिरोली (६३), हिंगोली (५१), लातूर (७०), असे लक्षणीय रिक्त पदे असल्याचे दिसून येत आहे.
तर नाशिक विभागात ४११ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोठ्या प्रमाणातील रिक्त जागांमुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, कर वसुली, आरोग्य सेवा आदी मूलभूत सेवांवर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. अनेक ठिकाणी अल्प मनुष्यबळावर कामकाज सुरू असल्याने कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण पडत आहे.
काही कर्मचाऱ्यांकडे एक ते दोन पदाचा प्रभार असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या रिक्त पदांची तत्काळ भरती करून स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी विविध स्तरातून जोर धरत आहे. या रिक्त पदांमुळे नगर परिषदा व नगर पंचायती या संस्थांमध्ये प्रशासकीय कामकाजावर ताण पडत आहे.