Maharashtra Guardian Minister changes 2025: सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. संजय सावकारे यांच्याकडून हे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले असून, आता पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असतील. संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
या बदलामागे संजय सावकारे यांच्याबद्दलची नाराजी हे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. सावकारे यांच्या कार्यकाळात शिवसेनेचे स्थानिक आमदार नरेंद्र भुंडेकरांची जिल्ह्यात ताकद वाढत असल्याची चर्चा होती.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शिवसेनेची ही वाढती ताकद कमी करण्यासाठी पंकज भोयर यांना संधी देण्यात आल्याचेही बोलले जात आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विश्वासू पंकज भोयर यांच्यावर अधिक विश्वास टाकण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे आता पंकज भोयर यांच्याकडे वर्ध्यासोबतच भंडारा जिल्ह्याचीही जबाबदारी असणार आहे. हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.