मोठी बातमी हा पुरावा नसल्यास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही Maharashtra Farmer Loan Waiver Documents

Maharashtra Farmer Loan Waiver Documents :शासन स्तरावर कर्जमाफीसंदर्भात डेटा पोर्टलवर अपलोड करण्याची बहुतेक प्रक्रिया जिल्ह्यातील बँकांद्वारा आटोपली आहे. यामध्ये ९२ टक्के शेतकरी खातेदारांची आधार कार्डसह आवश्यक माहिती भरण्यात आलेली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकांना दिलेले नाही. ते खातेदार कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शासना द्वारा प्रस्तावित कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी यावेळी ‘आधार’ हाच सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बँकांनी कर्जमाफीसंदर्भात हालचाली गतिमान केल्या आहेत.

आतापर्यत सुमारे ९२ टक्के शेतकरी खातेदारांची माहिती आधार क्रमांकासह पोर्टलवर जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांद्वारा अपलोड करण्यात आलेली असल्याची सहकार विभागाची माहिती आहे व अग्रणी बँकेद्वारा याला दुजोरा देण्यात आलेला आहे.

कर्जमाफीचा लाभघेण्यासाठी यावेळी ‘आधार’ हाच सर्वांत मोठा अडथळा ठरण्याची शक्यता अद्याप उर्वरित ८ टक्के शेतकऱ्यांनी अद्याप बँकांकडे आपले आधार कार्ड जमा केलेले नाही. यासंदर्भात सहकार विभागाचे कर्मचारी संबंधित खातेदाराच्या गृहभेटी घेत आहेत. प्रशासनाचे माहितीनुसार, आधार कार्डशिवाय पोर्टल कोणत्याही शेतकऱ्याची नोंदणी स्वीकारत नाही.

त्यामुळे हे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. बँकांद्वारा पोर्टलवर भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारे उच्च स्तर समितीत शासनाला अहवाल देईल. त्यानंतर कर्जमाफीचे निकष ठरविले जातील.

भारत सरकार

समर्थ शर्मा

पुरुष

२०-०६-१९८०

१२३४ ५६७८ ९०१२

माझा आधार

यामध्ये अडकणार कर्जमाफी

आधार लिंक नसणे : बँकेत खाते

असूनही आधार कार्ड अपडेट नसणे हा मोठा अडथळा.

केवायसी प्रलंबित अनेक शेतकऱ्यांनी

वर्षानुवर्षे आपल्या खात्याचे ‘केवायसी’ केलेले नाही.

तांत्रिक तफावत : आधारवरील नाव आणि सातबाऱ्यावरील नावातील चुकांमुळे पोर्टल डेटा नाकारत आहे.

मृत खातेदार सहकार विभागाचे कर्मचारी आधार कार्ड न दिलेल्या खातेदारांच्या घरी भेटी देत आहेत. काही खातेदार मृत असल्याचे पुढे येत आहे.

‘आधार’ची सक्ती कशासाठी?

शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात आहे. अशातच केवळ एका कागदपत्रांअभावी जर हक्काची कर्जमाफी मिळाली नाही, तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष भडकण्याची चिन्हे आहेत. आम्ही शेतकरी आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सातबारा पुरेसा नाही का? प्रत्येक गोष्टीला आधारची सक्ती कशासाठी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांद्वारा विचारला जात आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करावे. डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आधार नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शंकर कुंभार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती

Leave a Comment