जिल्हा बँकेतील नोकरी आता ‘नेट’वरून ३ संस्थांच्या माध्यमातून होणार ऑनलाइन पद्धतीने भरती. Maharashtra District Bank Recruitment 2025

Maharashtra District Bank Recruitment 2025: राज्यातील जिल्हा बँकेतील नोकर भरतीतील संचालकांच्या मर्जीला शासनाने आवर घातला आहे. यापुढे नोकर भरतीची प्रक्रिया शासनाने शिफारस केलेल्या तीनपैकी एका संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, असा आदेश सहकार विभागाने दिला आहे.

७० टक्के स्थानिकांना संधी

बँकांचे हित जोपासण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील ७० टक्के उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. ३० टक्के उमेदवार अन्य जिल्ह्यातील असतील.

आजोबांच्या जमीन, मालमत्तेवर नातवाचा हक्काबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल! काय परिणाम होणार? Property Rights Mumbai High Court Decision

जळगाव जिल्हा बँकेने काही

३१ जिल्हा बँकेत भरती सुरू

राज्यात ३१ जिल्हा बँका असून काही बँकांवर प्रशासक नेमलेले आहेत. या बँकांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ जिल्हा बँकेत १३३ रिक्त पदे आहेत. त्याचबरोबर जळगाव २२०, ठाणे १२३ आणि राज्य सहकारी बँकेत १६७ रिक्त पदे आहेत.

दिवसांपूर्वी काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या जाहिरातीत कला शाखेच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने नाराजीची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा बँकेतील नोकर भरतीवरून गेल्या काळात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले आहे. बँकेचे संचालक व आमदार एकनाथ खडसे यांनी नोकर भरती पारदर्शकपणे व्हावी यासाठी शासनाकडून नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत नोकर भरती करण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१०,००० रब्बी अनुदान मंजूर; तुम्हाला येणार का? येथे पहा Rabi Anudan List 2025

या संस्थांची शिफारस

भरती प्रक्रियेसाठी सहकार विभागाने तीन संस्थांची शिफारस केली आहे. त्यात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस), टाटा कन्सल्टन्सी सव्हिसेस (टीसीएस) व महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) या संस्थांचा समावेश आहे. या प्राधिकृत केलेल्या तीनपैकी एका संस्थेमार्फतच ही नोकर भरतीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment