Maharashtra Direct Service Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी एकूण ३६९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही भरती महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.
पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत पहारेकरी, मजूर, गुराखी, परिचर, दोग्धा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फराश, सफाई कामगार आणि तत्सम पदांचा समावेश आहे.
पहारेकरी पदासाठी किमान ७ वी उत्तीर्ण, तर इतर सर्व पदांसाठी ४ थी उत्तीर्ण ही किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तरी अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात तपासणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (दि. ०१ ऑगस्ट २०२५ रोजी)
खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
प्रकल्पग्रस्त (इतर प्रवर्ग): कमाल ४५ वर्षे
माजी सैनिक (खुला): ३८ वर्षे + सशस्त्र सेवेचा कालावधी + ३ वर्षे
माजी सैनिक (मागासवर्गीय/अनाथ): ४३ वर्षे + सशस्त्र सेवेचा कालावधी + ३ वर्षे
पदवीधर/पदविका धारक अंशकालीन उमेदवार: कमाल ५५ वर्षे
वेतनश्रेणी:
सर्व पदांसाठी एस-१ वेतनश्रेणी लागू असून ती ₹15,000 ते ₹47,600 इतकी आहे.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड व्यावसायिक चाचणी (६० गुण) आणि शारीरिक क्षमता चाचणी (४० गुण) यावर आधारित केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया व शुल्क:
ही भरती ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख: ०२ जुलै २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ ऑगस्ट २०२५
अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग – ₹1,000/-
मागासवर्गीय/ईडब्ल्यूएस/अनाथ – ₹900/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
आवक विभाग, कुलसचिव कार्यालय, प्रशासकीय इमारत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी – 431402
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात आपले अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पाठवावेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा