Magel Tyala Solar Pump: महावितरण कडून शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप दिला जात आहे. अशातच ज्या शेतकरी बांधवांनी सौर पंपासाठी अर्ज केला होता अशा शेतकरी बांधवांना आता पेमेंटचा ऑप्शन आला आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांना याचे संदेश म्हणजे एसएमएस देखील आले आहेत अशा शेतकरी बांधवांच्या मनात आता एक प्रश्न आला आहे की सौर पंपाचे पेमेंट करावे की नाही कारण अनेक लोकांना पेमेंट करूनही अडचणी आल्या आहेत त्यांचे पेमेंट यशस्वी झाले नाही त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा गोंधळ आहे. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मागेल त्याला सौर योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे आणि शेतकरी वर्गाकडून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून लवकरच शेतकऱ्यांना निवड केलेल्या कंपनीचे सौर पंप मिळणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केला होता अशा शेतकऱ्यांना आता पैसे भरण्याचे एसएमएस येऊ लागले आहे परंतु शेतकरी बांधवांच्या मनात संभ्रम आहे की पैसे भरावी की नाही काही फसवणूक तर होणार नाही ना. ? बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे याचे ताजे उदाहरण तुम्हाला माहीत असतील अनेक एप्लीकेशन आणि वेबसाईटच्या लिंक तुम्हाला एसएमएस द्वारे मिळतील आणि तुमचे पैसे कापले जातील. यासाठी सुरक्षित पेमेंट कसे करायचे आणि पेमेंट यशस्वी झाले किंवा नाही याची स्थिती कशी पहायची याची संपूर्ण माहिती पाहूया.
सौर पंपाचे पेमेंट करावे की नाही?
सौर पंपाचे पेमेंट करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील स्थानिक महावितरण कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही महावितरण कर्मचाऱ्यांना याविषयी सविस्तर अधिकृत माहिती असते जेणेकरून ते तुमची फसवणूक होण्यापासून टाळू शकतात.
जर तुम्हाला सुरक्षित पेमेंट करायचे असेल तर तुम्ही एखादे सेतू सेवा केंद्र चालक किंवा आपल्या जवळील एखाद्या सुशिक्षित व्यक्तीची मदत घेऊ शकता.
जे शेतकरी लवकर पेमेंट करतील आणि वेंडर सिलेक्शन करतील अशा शेतकऱ्यांना सौर पंप मिळतील. तुम्ही जर पेमेंट केले नाही तर तुमचा अर्ज अपूर्ण राहील आणि तुम्हाला सौर ऊर्जा मिळणार नाही.
सौर पंपाचे पेमेंट कसे करावे?
पेमेंट करण्याचा ऑप्शन आला किंवा नाही तपासण्यासाठी खालील प्रक्रिया करा:
- सुरुवातीला महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
- होम पेजवर असलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या पर्याया निवडा.
- उघडलेल्या पानावर लाभार्थी सुविधा (Beneficiary Services) हा पर्याय निवडा.
- यानंतर अर्जाची सद्यस्थिती (Application Status) या पर्यायावरती टच करा.
- Search by Beneficiary ID या पर्यायासमोरील रकान्यात तुमचा MK पासून सुरु होणारा आयडी क्रमांक टाका.
- त्यानंतर Search या बटणावर टच करा.
- पुढील विंडोमध्ये तुमची अर्जासंबंधीची सर्व माहिती दिसेल.
- अर्ज Draft स्थितीत असल्यास, पेमेंट बाकी असल्याचे दिसेल.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा
- Proceed Payment या बटणावर टच करून पुढे जा.
- पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट स्थितीत येईल.
टीप:- यूपीआय, क्रेडिट कार्ड किंवा एटीएम द्वारे पेमेंट करताना अनेक वेळा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या अडचणी टाळण्यासाठी तुम्ही सेतू केंद्र चालक किंवा महावितरण कर्मचारी यांची मदत घ्या.
Gold rate today सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार ? आज सकाळी सोन्याच्या भावात मोठी बदल….
Magel Tyala Solar Pump सौर पंपासाठी तुम्हाला किती पैसे भरावे लागणार?
पात्र अर्जदार शेतकऱ्यांना आता पैसे भरण्याचा पर्याय आला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना याचे मेसेज देखील आलेले आहेत. शेतकऱ्यांना पंपाच्या कॅपॅसिटीनुसार पैसे भरावा लागणार आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे. Magel Tyala Solar Pump Payment
- 3 एचपी साठी: ₹22,971/- प्लस पेमेंट गेटवे चार्जेस.
- 5 एचपी साठी: ₹32,075/- प्लस पेमेंट गेटवे चार्जेस.
- 7.5 एचपी साठी: कोटा सध्या उपलब्ध नाही उपलब्ध नाही.
सौर पंपासाठी कोणत्या शेतकऱ्यांनी पैसे भरू नयेत..? Magel Tyala Solar Pump
ज्या शेतकरी बांधवांनी अपूर्ण अर्ज भरला आहे किंवा काही चुकीची माहिती दिली असल्यास शक्यतो पैसे भरू नयेत. कारण अर्ज व्हरिफाय झाल्यानंतर छाननी अंतर्गत तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आणि भरलेले पैसे मिळण्यासअ भरपूर दिवसांचा कालावधी लागू शकतो.
पैसे भरण्यापूर्वी खालील गोष्टी चेक करा
- सातबारा उताऱ्यावर विहीर/बोअरवेल ची नोंद
- योग्य प्रकारची कागदपत्रे जसे आधार कार्ड मोबाईल नंबर नाव याची खात्री करा.
- सामायिक पाण्याच्या स्त्रोतासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अपलोड केले असेल.
- डार्क वॉटर शेड एरिया हे प्रमाणपत्र भूजल विभागाकडून घेतले आहे की नाही.
- अर्ज अपूर्ण असल्यास पैसे भरू नयेत.