राज्यातील महानगरपालिका, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाचे वेळापत्रक दि. 12/06/2025 | Local Government Election Schedule 2025

Local Government Election Schedule 2025: राज्यातील महानगरपालिका, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाचे वेळापत्रक दि. 12/06/2025

नगर विकास विभागाचे निर्देश – महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायती निवडणूक संदर्भात महत्त्वाचे आदेश

निवडणूकांची तयारी सुरू

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत संपूर्ण राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागाचे पुनर्रचना व मर्यादाबंधन (Delimitation) आवश्यक आहे. त्याच संदर्भातील सूचना 10 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आल्या आहेत.

परिपत्रक येथे पहा

प्रभाग रचनेसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर

सदर सूचना परिपत्रकासोबत प्रभाग रचनेसाठी एक कालबद्ध कार्यक्रम (Time-Bound Schedule) देखील जोडण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक टप्प्याच्या अंमलबजावणीची निश्चित तारीख व वेळेचे बंधन नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त व मुख्याधिकारी यांनी या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून सर्व टप्पे नियोजित वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि कठोरता

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चित वेळेत घेणे अनिवार्य असल्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत.

त्यामुळे घोषित केलेल्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये कोणत्याही टप्प्यावर कोणतीही सुट अथवा सवलत दिली जाणार नाही. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवून नियोजनानुसार योग्य ती कार्यवाही तातडीने करावी.

Leave a Comment