अंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे फेकू नका, ‘असा’ करा वापर, घर-कपाट होईल सुगंधी.Leftover Soap Reuse Ideas

Leftover Soap Reuse Ideas : अंघोळीचा साबण रोजच्या वापरातील वस्तू आहे, जो काही दिवसांत वापरून लगेच संपतो. अशावेळी त्या साबणाचा शेवटचा छोटा तुकडा आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. पण, तुम्हाला माहिती आहे का साबणाचे हे छोटे तुकडे तुमच्या घरातील अनेक मोठी कामे सोपी करू शकतात.

स्वयंपाकघर साफ करणे असो किंवा कपड्यांची काळजी घेणे असो. जर तुमच्याही घरात अंघोळीच्या साबणाचे छोटे तुकडे पडले असतील तर ते फेकण्याऐवजी गोळा करा, कारण आम्ही तुम्हाला उरलेल्या साबणाच्या वापराबद्दल सांगणार आहोत.

१) बॅग – जॅकेटची चेन दुरुस्त करण्यासाठी

बऱ्याचदा जुने जॅकेट, बॅग किंवा जीन्सची चेन अचानक खराब होते, जी जोर लावून पण बंद किंवा उघडत नाही. या परिस्थितीत साबणाचा एक छोटासा तुकडा त्या चेनवर घासून तुम्ही ती दुरुस्त करू शकता. साबणाचा तुकडा हलक्या हाताने चेनवर घासा आणि चेन दोन किंवा तीन वेळा वर-खाली करा. साबण वंगण म्हणून काम करतो, ज्यामुळे चेन नीट बंद किंवा उघडते.

जर तुमच्या दारांवरील किंवा खिडक्यांच्या बिजागरांमधून कर्कश्श आवाज येत असतील तर त्यावर ओला साबण चोळा, यामुळे आवाज लगेच थांबेल.

२) कपड्यांच्या सुगंधीसाठी

हिवाळा असो किंवा उन्हाळा कपड्यांना दुर्गंधी येणे सामान्य आहे. लोक ते दूर करण्यासाठी अनेकदा फ्रेग्रंन्स स्प्रे खरेदी करतात, परंतु तुम्ही त्याऐवजी साबणाचा तुकडा वापरू शकता. जर कपाट किंवा शू रॅकमधून ओलाव्यामुळे दुर्गंधी येत असेल तर साबणाचे कोरडे तुकडे मलमलच्या कापडात बांधून तिथे ठेवा.

३) शिवणकामात खडूऐवजी साबण वापरा

जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर खडू म्हणून साबणाचा तुकडा वापरा. कापडावर निशाण बनवण्यासाठी खडूपेक्षा साबणाचा तुकडा वापरू शकता, अशाने कापडावरील निशाण सहज धुतले जाते आणि कापडावर डाग पडत नाही.

४) बागेत करा साबणाच्या तुकड्याचा वापर

जर तुमच्या बागेतील झाडांवर कीटकांचा प्रादुर्भाव होत असेल तर तुम्ही तिथे या साबणाच्या तुकड्यांचा वापर करू शकता. साबण पाण्यात विरघळवा आणि हे पाणी हलके फवारणी करा, जेणेकरून ते प्रभावी कीटकनाशक म्हणून काम करेल. फक्त जास्त साबण वापरला जाणार नाही याची खात्री करा तसेच साबण नैसर्गिकरित्या बनवलेला असावा.

Leave a Comment