जमीन मोजणी केली, पण मोजणीत तफावत आढळत आहे, काय करावे? वाचा संपूर्ण प्रक्रिया Land Record Jamin Mojani

Land Record Jamin Mojani: महाराष्ट्रात जमीन मोजणी (Land Survey) आता ई-मोजणी (e-Mojani) प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने ३० दिवसांच्या आत पूर्ण केली जाते.

भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून हद्दकायम, पोटहिस्सा, किंवा इतर मोजणीसाठी अर्ज करता येतो.

मोजणीसाठी फी ऑनलाइन भरावी लागते, आणि तातडीच्या मोजणीची सुविधाही उपलब्ध आहे, अनेकदा जमिनीच्या मोजणीत तफावत आढळण्याची शक्यता असते.

सातबारावरील नोंद आणि प्रत्यक्षात जमिनीचे क्षेत्रफळ यातील तफावत (फरक) अनेक कारणांमुळे उद्भवते, अशावेळी काय करायचं, हे समजून घेऊयात…

एक उदाहरण पाहुयात

२०१७ मध्ये मोजणी करून प्रमोद व अशोक गभणे या भावांच्या शेतीचा पोटहिस्सा निश्चित केला होता. दरम्यान, त्याच्या शेताशेजारील शेतकरी अनिल भुरे यांनी रामकुमार चौधरी यांना २६ जुलै २०२२ ला शेती विकली. ७ नोव्हेंबर २०२४ ला शेतीचे मोजमाप केले असता, प्रमोद गभणे यांच्या शेतात १५ फूट हद्द निघाली.

त्यानंतर ५ डिसेंबर २०२५ ला फेरमोजणी केली. यावेळी अशोकच्या जमिनीची हद्द पूर्वीसारखीच राहिली; पण प्रमोदच्या जमिनीची हद्द चौधरी यांच्या शेतात काढण्यात आली. त्यामुळे पुन्हा ५ जानेवारी २०२६ ला फेरमोजणी केली.

यात ती जमीन प्रमोद गभणे यांच्या हद्दीत असल्याचे मोजमापात आले. या मोजणीवर चौधरी यांनी ३१ जानेवारी २०२६ ला आक्षेप घेतला. पुन्हा मोजणी करून घेतली. त्यातही तफावत आढळली. यामुळे वाद वाढला.

अशावेळी काय करायचं?

ई-मोजणी/रोव्हर मशीन (DGPS) : रोव्हर मशीनद्वारे

अत्याधुनिक आणि अचूक मोजणी केली जात आहे.

सरकारी मोजणी : भूमी अभिलेख विभागामार्फत (Land

Records Dept) अधिकृत मोजणी करून नकाशा अद्ययावत करणे.

पोटहिस्सा मोजणी : जमिनीच्या तुकड्यांची पोटहिस्सा मोजणी करून नोंदी दुरुस्त करणे.

भू-आधार : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनींना Unique ID देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तफावत आढळल्यास, शेतकरी भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर अर्ज करून आणि फी भरून (२ हेक्टरपर्यंत साधारण २ हजार रुपये) जमिनीची हद्द कायम मोजणी (Boundry Dispute Measurement) करून घेऊ शकतात.

Leave a Comment