land and village map download:ऑनलाईन पोर्टल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोणत्याही जमिनीचा नकाशा पाहता येतो. ऑनलाईन पद्धतीने Land Map पाहणे अत्यंत सोपे आहे. आता आपण भूनकाशा कसा पाहायचा ते पाहूया…
जमीन नकाशा वेबसाईट
मित्रानो सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे.
सर्वप्रथम वेबसाईट वर डाव्या बाजूला राज्य निवडा या पर्यायावर क्लिक करून महाराष्ट्र राज्य निवडा.
त्यानंतर Rural (ग्रामीण) किंवा Urban (शहरी) यापैकी तुमचा पर्याय निवडा. आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल, त्यापैकी तुमचा तालुका निवडा.
यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे, गाव निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा नकाशा दिसू लागेल. यात गावातील प्रमुख रस्ते ही दिसतील.
आता तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी गट नंबर टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा दिसेल.
जमीन नकाशा वेबसाईट
महाराष्ट्रातील जमिनीचा व गावाचा नकाशा मोबाईलवर डाउनलोड करण्यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा:
जमीन नकाशा अधिकृत वेबसाईट. 👈
महाभूमी पोर्टल वापरा: महाराष्ट्र सरकारच्या ‘महाभूमी’ (mahabhumi.gov.in) वेबसाइटवर जा किंवा ‘Mahabhumi’ अॅप डाउनलोड करा.
नोंदणी/लॉगिन: तुमचे खाते तयार करा किंवा लॉगिन करा.
गाव व जमीन निवडा: जिल्हा, तालुका, गाव आणि सर्व्हे नंबर टाका.
नकाशा डाउनलोड: नकाशा पाहून ‘डाउनलोड’ पर्याय निवडा आणि PDF स्वरूपात सेव्ह करा.
ऑफलाइन अॅप्स: Google Maps किंवा Bhuvan अॅप वापरून ऑफलाइन नकाशा डाउनलोड करा.
टीप: इंटरनेट कनेक्शन आणि योग्य माहिती आवश्यक आहे. अधिकृत पोर्टलवरूनच माहिती घ्या.