Ladki Bahin Yojana Loan: कोणत्याही गॅरंटीशिवाय लाडक्या बहिणींना मिळणार २५ लाखांचे कर्ज; सरकारची योजना आहे तरी काय?

Ladki Bahin Yojana Loan:स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी आता बचत गटाला मदत मिळणार आहे.बचत गटाला २५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी नवी योजना महिलांना मिळणार २५ लाखांचे लोन स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी बचत गटाला मिळणार निधी

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता महिलांना जवळपास २५ लाखांचे कर्ज मिळणार आहे. त्यासाठी गावातील महिलांना बचत गट स्थापन करायचा आहे. बचत गटाला हे कर्ज दिले जाते. यामुळे महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होते.

२५ लाखांचे लोन मिळणार

महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँकांकडून दीड लाखांपर्यंत कर्ज मिळते. कर्ज परत केल्यानंतर महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. कर्जाची मर्यादा वाढवून देण्यात येणार आहे. बचत गटाने व्यवसाय सुरु केल्यानंतर त्याचा कृती आराखडा बँकेत सादर करायचा आहे. यानंतर त्यांना ३ ते २५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यामुळे लहान व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार आहे.

बचत गटातील महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी हे कर्ज दिले जाते. यासाठी महिलांना कोणतेही तारण ठेवावे लागत नाही. याचसोबत गॅरंटी म्हणून जामीनदार लागत नाही. या योजनेत तुम्हाला तुमच्या व्यवसायानुसार लोन दिले जाणार आहे.

या योजनेत कर्जाचे हप्ते महिलांना दर महिन्याला भरायचे असतात. त्यांना हा हप्ता सहजपणे भरता येईल एवढीच रक्कम असते. त्यामुळे महिलांना हे हप्तेदेखील भरता येतात.

व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे हप्ता ठरवला जातो. महिलांनी सुरु केलेले लहान मोठे व्यवसाय चांगले सुरु राहावेत, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

नवीन बचत गट कसा स्थापन करायचा?

गावातील किमान १० महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करायचा आहे. यासाठी गाव स्तरावरील समुदाय संस्थान व्यक्तीकडे कागदपत्रे द्यायची आहे. या बचत गटाची ऑनलाइन नोंदणी करायची आहे. यासाठी संयुक्त खाते उघडावे लाते. यानंतर उमेदकडून ३० हजार रुपयांचा निधी दिला जातो.

Leave a Comment