मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत निधी वितरीत शासन निर्णय! उद्यापासून खात्यावर हप्ता जमा Ladki Bahin Yojana Insttalment Deposit

Ladki Bahin Yojana Insttalment Deposit:मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत निधी वितरीत

संदर्भ :-

(१) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. मबावि-२०२४/प्र.क्र.९६/कार्या-२, दि.२८.०६.२०२४, दि.०३.०७.२०२४, दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४.

(२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-२, दि.०७.०४.२०२५.

(३) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि.०२.०५.२०२५ व दि.०५.०६.२०२५.

(४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. बीजीटी-२०२५/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प (विघयो), दि.०१.०७.२०२५.

50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन ; GR निर्गमित दि.01.07.2025 | State Employees Retirement Update

प्रस्तावना :-

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सदर योजनेंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम देण्यात येते.

भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू घोषणापत्र, रजिस्ट्रेशन, ऑनलाइन अर्ज | Bandhkam Kamgar Bhandi Vatap Yojana

सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्र. एन-३, लेखाशिर्ष २२३५ डी७६७ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेतर) या उद्दिष्टाखाली रु.३९६०.०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

सदर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर (BEAMS) रु.४१०.३० कोटी (अक्षरी रु. चारशे दहा कोटी तीस लाख फक्त) इतका निधी या विभागास उपलब्ध करुन दिला आहे. सदर उपलब्ध करुन दिलेला निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय :-

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटकांसाठी मागणी क्र. एन-३, लेखाशिर्ष २२३५ डी७६७ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेतर) या उद्दिष्टाखाली रु.३९६०.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद

IMG 20250702 WA0078

Leave a Comment