लाडकी बहीण योजना : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जून महिन्याचे ₹1500 हप्त्या बाबत मोठी अपडेट Ladki Bahin Yojana Insttalment

Ladki Bahin Yojana Insttalment:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवार यांनी सांगितलं की, “जवळपास ₹3600 कोटी रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी पाठवले आहेत.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एक वर्ष पूर्ण!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक वर्षाची झाली आहे. या योजनेचा पहिला निर्णय 29 जून 2024 रोजी घेतला गेला होता. आतापर्यंत या योजनेतून 11 हप्त्यांचे ₹16500 रुपये लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. यामध्ये मे महिन्याचा हप्ता 7 जूनच्या सुमारास जमा झाला होता, तर आता जून महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे.

कोणाला किती रक्कम मिळते?

सामान्य लाभार्थी महिलांना: दरमहा ₹1500

PM किसान आणि नमो शेतकरी निधी मिळणाऱ्या महिलांना: ₹500

(कारण त्या महिलांना या योजनांमधून आधीच ₹12000 मिळत असल्याने उर्वरित ₹6000 रक्कम लाडकी बहीण योजनेतून दिली जाते.)

सध्या अशा 7 ते 8 लाख महिला आहेत ज्यांना या दोन्ही योजना लागू होतात. शासनाचं उद्दिष्ट म्हणजे वर्षभरात एकूण ₹18000 प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळावं.

लाडकी बहीण हप्ता शासन निर्णय आणि लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment