Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी अनिवार्य केले आहे. दरम्यान आता ई केवायसीमधून ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.
लाडक्या बहिणींना ई केवायसी अनिवार्य
२.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद होणार
राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कर्जमाफी! आली मोठी अपडेट समोर Farmer’ Loan waiver
ई केवायसीतून सर्व माहिती उघडकीस
लाडकी बहीण योजनेत महिलांची केवायसी अनिवार्य केली आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीत. दरम्यान, केवायसीमध्येही ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत.
त्यांची माहिती मिळणार आहे आणि त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहेत. आता वार्षिक उत्पन्न जर २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना फटका बसणार आहे. या महिलांची माहिती ई केवायसीमध्ये उघडकीस येणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी सर्व महिलांना केवायसी करायची आहे. दरम्यान, या केवायसीत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ईकेवायसी करणे गरजेचे आहे. ई केवायसीमधून महिलांची सर्व माहिती मिळणार आहे. महिलांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी होणार आहे. त्यामुळे या महिलांचे वार्षिक उत्पन्न, वय याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. याच माहितीच्या आधारे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मोठी अपडेट Maharashtra Panchayat Raj Election 2025
लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी योजनेता लाभ घेतला आहे. या योजनेत निकषांबाहेर जाऊनदेखील महिलांनी लाभ घेतला होता. त्यानंतर महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. यामधून ५२ लाख महिला अपात्र असल्याची माहिती समोर आली. त्यांचे लाभ बंद करण्यात आले.
प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार माहिती
आता ई केवायसीनंतर लाडक्या बहिणींची सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे. प्राप्तिकर विभाग या माहितीची पडताळणी करेल. यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा