Ladki Bahin Yojana 6th Insttalment:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून करण्यात आली होती या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती या कालावधीमध्ये तीन कोटी ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले त्या अर्जाची पडताळणी करून दोन कोटी 34 लाख पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला होता.
पण आता राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आल्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा खूप आनंदाचे दिवस आले आहेत कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठे बदल होणार आहेत व सरकार कोणते बदल करणार आहेत ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊ.
आत्ताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण खूप मोठी गेमचजर ठरली आणि महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आले आहे आणि लवकरच राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे.
राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये दर महिन्याला मिळत होते परंतु आता या रकमेमध्ये वाढ करून 2100 केले जाणार आहेत आणि ही रक्कम डिसेंबर महिन्यापासून महिलांना मिळण्यास सुरुवात होईल.
च्या महिला अपात्र आहेत त्यांना देखील एकवीस रुपये मिळणार
राज्य व केंद्र सरकारकडून राज्यातील लाखो महिलांना निराधार योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना दिला जात आहे परंतु या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही कारण सरकारने या महिलांना अपात्र ठेवलेला आहे परंतु अशा पण महिलांना सरकार मोठे गिफ्ट देणार आहे कारण सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करणार असून आणि आता महिलांना 2100 रुपये महिना दिला जाणार आहे आणि ही रक्कम डिसेंबर महिन्यापासून महिलांना मिळण्यास सुरुवात होईल.