वडील किंवा पतीचं निधन, अथवा घटस्फोटीत महिलांनी E-KYC कशी करावी? सरकारकडून महत्त्वाची सूचना.ladki bahin new update kyc last date

ladki bahin new update kyc last date:महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी करण्यासाठीची मुदत वाढवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात महिलांची ई-केवायसीसाठी लगबग सुरु होती. ई-केवायसी करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन होती.

तसेच ती अत्यंत सोपी देखील होती. पण अनेकदा वेबसाईट योग्यप्रकारे काम करत नसल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी करताना अडचणी येत होत्या. ई-केवायसीची प्रक्रिया खरं पाहायला गेलं तर खूप सोपी होती. पण या प्रक्रियेत ओटीपीच्या स्टेप्समध्ये अनेक महिलांना अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलं होतं. हीच गोष्ट आता सरकारच्या देखील निदर्शनास आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंत होम कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! Bank of Maharashtra Loan

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना सरकारच्या वेबसाईटवर आधी लाभार्थी महिलेचा आधारकार्ड नंबर टाकावा लागतो. त्यानंतर महिलेचं आधारकार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्यावर ओटीपी येतो. हा ओटीपी आल्यानंतर महिलेचे वडील किंवा पती यांचा आधारकार्ड नंबर टाकावा लागतो. त्यानंतर ते आधारकार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्यावर ओटीपी येतो. पण काही महिलांना खूप अडचणी येत होत्या. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! उर्वरित १ हेक्टर नुकसान भरपाई खात्यात जमा होण्यास सुरुवात Crop Insurance Distributor

काही महिलांचे पती किंवा वडिलांचं दुर्दैवाने निधन झालं असेल किंवा महिलांचा घटस्फोट झाला असेल तर त्यांना ई-केवायसी करताना ओटीपीसाठी खूप अडचणी येत होता. त्यांना तो ओटीपी मिळत नव्हता. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. पण राज्य सरकारने त्यावर आता पर्याय सूचवला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशा लाभार्थी महिलांना मोलाचं आवाहन केलं आहे. एकाही लाभार्थी महिलेला फटका बसू नये, असा उद्देश यामागे सरकारचा आहे. आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबाबत महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

Leave a Comment