Ladki Bahin Loan Yojana Maharashtra 2025 : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी याआधीपासून कर्जसुविधेची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने अनेक लाडक्या बहिणी कधीपासून या योजनेची वाट पाहत होत्या.
आता मात्र अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे – या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून पात्र महिलांना तब्बल 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे!
योजना कशी राबवली जात आहे?
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जात असून, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज प्रदान केले जाणार आहे.
पूर्वी या कर्जावर 9% व्याज आकारले जात होते, मात्र अनेक सुचविल्याप्रमाणे महिलांवर व्याजाचा बोजा टाकणे योग्य नाही असे ठरवले गेले. त्यामुळे आता हे कर्ज पूर्णपणे शून्य टक्के व्याजदराने देण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.
व्याजाची परतफेड कशी होणार?
कर्जावर महिलांनी व्याजाचा हप्ता भरल्यावर त्याच दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम परत जमा केली जाणार आहे. यामुळे एकंदरीत त्यांना मिळणारे कर्ज बिनव्याजी राहणार आहे.
या योजनेसोबत कोणत्या महामंडळांचा समावेश?
लाडकी बहीण योजना इतर राज्यस्तरीय योजनांशी संलग्न करण्यात आलेली आहे, जसे की:
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ
वसंतराव नाईक महामंडळ (भटक्या व विमुक्तांसाठी)
ओबीसी महामंडळ
या मंडळांकडून व्याज परतावा देण्यात येणार आहे.
महिला गटासाठी विशेष सुविधा:
जर महिलांनी समूह अथवा गटात व्यवसाय करण्याचे ठरवले, तर एका महिलेला ₹1 लाख या प्रमाणात 10 महिलांच्या गटाला एकूण ₹10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यामुळे महिलांना केवळ आर्थिक मदतच मिळणार नाही, तर त्यांच्या व्यवसायाला भक्कम आधार मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संपर्क साधावा.
आधार, ओळखपत्र, व्यवसायाची माहिती आणि बँक खात्याचे तपशील आवश्यक असतील.
योजनेचा उद्देश:
या योजनेद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणे, उद्योग-व्यवसायास चालना देणे आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीस मदत करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा