Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. तुम्ही कधी गॅसवर नारळ ठेवलाय का? नाही ना.. मग आता गॅसवर नारळ ठेवाच..याचा परिणाम पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार.Crop Insurance
भारतीय स्वयंपाकात नारळाला स्वयंपाकघरातील राजा म्हणायला हरकत नाही. दक्षिण भारतीय सांबारची चव असो, कोकणी-गोवन करीचा सुगंध असो किंवा मराठी घरातील रोजच्या चुलीवर शिजणारा आमटी भात ओला नारळ आणि ताजं खोबरं हा अनेक पदार्थांचा जीव असतो. स्वयंपाकात गोडवा, मऊपणा आणि श्रीमंती टेक्स्चर देण्याचं सामर्थ्य फक्त नारळातच आहे. त्यामुळे बहुतेक घरात आठवड्यातून एकदा तरी नारळ फोडण्याची वेळ येतेच. पण हा नारळ फोडणंच अनेकांसाठी मोठं आव्हान असतं. मात्र आता तुमचं हे टेन्शन कायमचं संपणार आहे.
नारळ फोडणे केवळ अवघडच नाही तर त्याच्या कवचातून बाहेर काढणे हे त्याहूनही कठीण काम आहे. एका महिलेनं सांगितल्याप्रमाणे नारळ गॅसवर ठेवायचा आहे. त्यानंतर नारळाला गोल सगळीकडून शेकवायचं आहे. त्यामुळे नारळ आतून करवंटीपासून वेगळा होतो. थंड झाल्यावर तो फोडायचा आहे यावेळी तो सहज संपूर्ण गोल आकारात बाहेर पडतो.
मोठी बातमी कर्जमाफीच्या दिशेने पाऊल; शेतकऱ्यांची माहिती मागवली.Farmer Loan waiver Update 2025
खरे तर नारळाची साल इतकी घट्ट असते की ती सहज फोडणे शक्य होत नाही.मात्र हा जुगाड करुन जास्त मेहनत किंवा ताकद न लावता तुम्ही सहज नारळ फोडू शकता. अशा प्रकारे एका भांड्यात नारळाचे पाणी काढा. लगदा देखील सहज वेगळा होईल. या सोप्या युक्तीने नारळ कोणत्याही त्रासाशिवाय फुटेल.हा उपाय तुम्ही देखील वापरू शकता.
पाहा व्हिडीओ