Kitchen Jugaad : तंत्रज्ञानाचा विकास जितका वेगाने होतोय तितक्याच वेगाने त्यांचा गैरवापरही होत आहे. याचाच वापर करुन अन्नधान्यांमध्ये देखील भेसळीचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यातून भारताचा बासमती तांदूळ देखील वाचलेला नाही. भारतीय बासमती तांदळाचा खप देशात आणि जगात वाढत आहे. हा खप पूर्ण करण्यासाठी अनेक लोक बनावट प्लास्टिकचे तांदूळ विकत आहेत.
हा प्लास्टिकचा तांदूळ हातात घेतल्यावर तो खऱ्या बासमती तांदळासारखा दिसतो. रंगही तोच, सुगंध आणि चव जवळजवळ सारखीच. मात्र हा तांदूळ खाल्ल्यानं अनेक आजार होत आहेत. त्यामुळे तुम्हीही जर विकतचे तांदूळ खात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा. एका गृहीणीने प्लॅस्टिकचे तांदूळ कसे ओळखायचे याचा एक सोपा जुगाड दाखवला आहे. या किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
शाळांना सुट्ट्या: २५ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत शाळा बंद! School Holiday
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.आज हा प्लास्टिकचा तांदूळ भेसळ करून विकला जात आहे, ही चिंतेची बाब आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी तांदळाची ओळख करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
याचबाबत आम्ही आज आपल्याला माहिती देणार आहोत. तांदळाचे काही दाणे हातात घेतल्याने तुम्हाला तांदूळ खरा आहे की खोटा हे कळू शकत नाही. त्यासाठी बासमती तांदूळ आणि प्लास्टिक तांदूळ यांची खरी माहिती असणं गरजेचं आहे. आपण घरच्या घरी काही सोप्या प्रक्रिया करून देखील याची सत्यता पडताळू शकता.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हला फक्त गॅस मध्यम आचेवर सुरु करुन त्यावर तांदळाचे थोडे दाणे टाकायचे आहेत. यानंतर २ मिनिटांत गॅस बंद करा. गॅस बर्नर थंड झाल्यावर त्यावर टाकलेले तांदूळ हातात घेऊन पाहा. तांदूळ दाबून जर त्याचा चुरा झाला तर ते प्लॅस्टिकचे नाहीत. पण जर तांदळाचा चुरा किंवा राख नाही झाली तर तो तांदूळ प्लॅस्टिकचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकतचे तांदूळ आणल्यानंतर तुम्हीही ही जुगाडू टीप नक्की फॉलो करा.
पाहा व्हिडीओ
टीप: ही टिप सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही माहिती प्रत्यक्ष अमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
simply marathi या युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.