Kitchen jugad: सकाळी घाईघाईत टिफिन करताना किंवा दुपारी स्वयंपाक करताना अचानक सिलेंडर संपले की वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. पण आता गॅस अचानक संपण्याची झंझटच नाही. गॅसवर प्लॅस्टिकच्या बाटल्या ठेवण्याचा असा चमत्कारिक फायदा तुम्हाला माहितीच नसेल. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. गॅसवर प्लॅस्टिकच्या बाटल्या ठेवूण तुम्ही गॅसची बचत करू शकता.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्लॅस्टिकच्या बॉटलची कमाल
आता तुम्हाला काय करायचं ते पाहूयात, दोन मध्यम आकाराच्या दोन बॉटल घ्यायच्या आहेत. या बॉटलचा पुढचा भाग कापायचा आहे, त्यानंतर उरलेला भाग घेऊन तो गॅसच्या बर्नवर उलटा ठेवायचा आहे. यामुळे कोणतीही घाण, अन्न या बर्नरमध्ये जाणार नाही. नेहमी पाहिलं असेल बर्याचदा बर्नर नीट पेटत नाही. बर्नरची छिद्रे ब्लॉक झालेली असतात. त्यामुळे बर्नरच्या बाजूने गॅस बाहेर पडतो. सिलेंडरमधून गॅस निघूनही बर्नर मधून तो वाया जातो. त्यामुळे गॅस लवकर संपतो. पण हा उपाय केल्याने बर्नर वरील छिद्र मोकळी होतील आणि गॅस छिद्रातूनच बाहेर पडेल. यामुळे गॅसचीही बचत होईल गॅस लवकर संपणार नाही, असा दावा या गृहिणीने केला आहे.