कामगारांना ‘या’ योजने अंतर्गत दरमहा मिळणार 5000/- रुपये पेन्शन ! Kamgar Pension Yojana

Kamgar Pension Yojana:कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु केली आहे. ही योजना रिक्षाचालक, हमाल, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला, शेतमजूर अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. वृद्धावस्थेत आर्थिक आधार मिळावा, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेत सहभागी झाल्यास, थोडीशी रक्कम दरमहा भरून ६० वर्षांनंतर दरमहा ३,००० ते ५,००० रुपये पेन्शन मिळू शकते. ही रक्कम आयुष्यभर मिळत राहते, त्यामुळे वृद्धापकाळात स्थिर उत्पन्नाचे मोठे साधन ठरते.

योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात कामगार जितकी रक्कम भरतो, तितकीच रक्कम सरकारकडूनही भरली जाते. याला मॅचिंग कंट्रिब्युशन म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने दरमहा ₹100 भरले, तर सरकारसुद्धा दरमहा ₹100 जमा करतं. त्यामुळे एकूण ₹200 तुमच्या खात्यात जमा होतात आणि त्यावर व्याजही मिळते.

या योजनेचे काही महत्त्वाचे नियम

1. अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असावे.

2. मासिक उत्पन्न ₹१५,००० पेक्षा कमी असावे.

3. अर्जदार आधीच EPFO, ESIC किंवा NPS योजनेचा सदस्य नसावा.

4. वैध आधार कार्ड व बँक खाते असणे आवश्यक आहे.

पालघर नगर परिषद भरती 2025 : उमेदवारांसाठी 35000/- पगाराची सरकारी नोकरीची संधी! | Palghar Nagar Parishad Bharti 2025

अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावे लागते. अर्ज करताना आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत न्यायचे आहे. CSC ऑपरेटर तुमची माहिती k.at ऑनलाईन भरतो आणि बायोमेट्रिक ओळख तपासतो. अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला योजनेचे कार्ड आणि युनिक आयडी दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे.

ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि गरजू कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भविष्यातील सुरक्षिततेसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.

राज्यात जमिनीच्या तुकडे बंदी कायद्यात सुधारणा, महसूल मंत्र्याची मोठी घोषणा | Land Tukdabandi 2025

Leave a Comment