Indian Railway Recruitment 2025:भारतीय रेल्वेने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. स्टेशन मास्टर, लेखापाल, लिपिक, टिकीट सुपरवायझर, ट्रेन व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी तब्बल 30,307 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, पात्र उमेदवारांना दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.
जाहिरात येथे पहा
रिक्त पदांची संख्या
या महाभरतीत वेगवेगळ्या पदांसाठी रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत –
टिकीट सुपरवायझर – 6,235 पदे
स्टेशन मास्टर – 5,623 पदे
ट्रेन व्यवस्थापक – 3,562 पदे
कनिष्ठ लेखा सहाय्यक कम टायपिस्ट – 7,520 पदे
वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट – 7,367 पदे
एकूण पदांची संख्या मिळून 30,307 एवढी आहे.
मोठी बातमी या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी School Holiday on Tuesday
वेतनमान (Pay Scale)
पदांनुसार वेतनमान पुढीलप्रमाणे असणार आहे –
टिकीट सुपरवायझर – ₹35,400
स्टेशन मास्टर – ₹35,400
ट्रेन व्यवस्थापक – ₹29,200
कनिष्ठ लेखा सहाय्यक / कम टायपिस्ट – ₹29,200
वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट – ₹29,200
अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दि. 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 29 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
महत्वाची सूचना
संपूर्ण पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व इतर अटी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहीरात नीट वाचावी.