मोठी बातमी : रेल्वेत 11,127 पदांसाठी भरती; तरुणांसाठी सुवर्णसंधी!Indian Railway Bharti 2026

Indian Railway Bharti 2026 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. Railway Recruitment Board (RRB) मार्फत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 11,127 रिक्त पदे भरली जाणार आहेत.र्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार 14 जून 2026 (रात्री 12 वाजेपर्यंत) अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी Railway Recruitment Board च्या अधिकृत वेबसाईटवर (rrbapply.gov.in) जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.

सविस्तर अधिसूचना लवकरच

सध्या ही केवळ प्राथमिक (Indicative) सूचना जारी करण्यात आली आहे. Ministry of Railways कडून लवकरच सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, त्यामध्ये पात्रता, परीक्षा पद्धती, आरक्षण, शुल्क आणि इतर सर्व तपशील दिले जातील.

 

पदसंख्या आणि वयोमर्यादा

एकूण पदे: 11,127

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 30 वर्षे

आरक्षित प्रवर्गांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल

पगार आणि सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल-2 अंतर्गत सुरुवातीला ₹19,900 पगार दिला जाईल.

याशिवाय महागाई भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर सरकारी सुविधा देखील मिळतील.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही अट पूर्ण केलेली असावी:

मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण

संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र

किंवा

मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांतून केली जाईल:

CBT-1 (कंप्युटर आधारित परीक्षा)

CBT-2

कंप्युटर आधारित अॅप्टिट्यूड टेस्ट

डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

मेडिकल टेस्ट

सर्व टप्प्यांत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवड दिली जाईल.

महत्त्वाची सूचना

ही भरती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू करणे आवश्यक आहे. सविस्तर अधिसूचना आल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.

Leave a Comment