Important circular issued regarding employee leave rules:सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय / स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये मुंबई विभाग, मुंबई
विषयः- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत.
संदर्भ:-१. महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती (नियमावली) १९८१
२. या कार्यालयाचे पत्र क्र.शिउसं/उमावि ४/परिपत्रक/रजा/२०२५/२५२८ दि. ५.०३.२०२५
३. मा. शिक्षक आमदार श्री. ज. मो. अभ्यंकर, मुंबई यांच्या समवेत सहविचार सभा दिनांक ९.१२.२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७ मधील ५ (२) नुसार सहायक शिक्षक (परिवीक्षाधीन) म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी परिविक्षाधीन असेल. असे नमूद आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती (नियमावली) १९८१ मधील नियम १६ (२३) नुसार “अस्थायी (परिविक्षाधीन) कर्मचाऱ्याला नैमितिक व प्रसूती रजेव्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही.
अस्थायी कर्मचाऱ्याची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा, त्याची पुर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल.”
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्मित केलेले शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू केलेल्या अर्जित रजा, वैद्यकीय रजा, बालसंगोपन रजा व इतर विशेष रजा लागू राहतील. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.