अवकाळीचं मोठं संकट राज्यावर! तब्बल 9 जिल्ह्यांत अलर्ट, वादळी वाऱ्यासह..IMD Weather Update

अवकाळीचं मोठं संकट राज्यावर! तब्बल 9 जिल्ह्यांत अलर्ट, वादळी वाऱ्यासह..

IMD Weather Update : वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज दिला. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा मोठा अंदाज आहे. पुढील काही तास धोक्याची असणार आहेत

वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. थंडी, उन्ह आणि पाऊस अशी स्थिती आहे. राज्यात सकाळी थंडीची चाहूल आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहे. मुळात म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे.

डिसेंबर महिन्यात थंडी होती पण जानेवारी महिन्यात तापमानात चढउतार बघायला मिळाला. जशी थंडी अपेक्षित होती, तशी थंडी नाही पडली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच सांगितले गेले होते की, या महिन्यात थंडी कमी होईल. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असतानाही राज्यात म्हणावी तशी थंडी झाली नाही.

काही राज्यात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे तर काही राज्यात पावसाचे मोठे संकट आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. हवा घातक बनलीये. हवा इतकी जास्त खराब झाली की, धुके पडल्यासारखे दिसत आहे. मुंबईतील वायू प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील हवामानात पुढील काही दिवस सतत चढउतार बघायला मिळेल. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाचा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र यासोबतच विदर्भातील काही भागात पाऊस होईल. लातूर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, धाराशिव, चंद्रपूर या भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे 14.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यासोबतच दुपारी उकाडा जाणवेल.

Leave a Comment