IB Mahabharti 2025:केंद्रीय गुप्तचर विभाग अर्थात Intelligence Bureau (IB) अंतर्गत सुरक्षा सहाय्यक / एक्झिक्युटिव्ह पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 4,987 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांचे नाव व संख्या
या भरतीत सुरक्षा सहाय्यक/एक्झिक्युटिव्ह पदासाठी एकूण 4,987 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इयत्ता 10 वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (जाहिरात पहा)
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 17 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ३ वर्षे वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया व शुल्क
पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 26 जुलै 2025 पासून 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत अधिकृत वेबसाईट https://onlineapplication वर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज शुल्क General / OBC / EWS प्रवर्गासाठी ₹650/- असून, SC / ST / महिला / माजी सैनिक उमेदवारांसाठी ₹550/- इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
महत्वाची टीप
भरती प्रक्रिया, शैक्षणिक अर्हता, आरक्षण, परीक्षा पद्धती यासंदर्भातील सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.