मोठी बातमी : HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड ! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; HSRP UPDATE 2025

HSRP UPDATE 2025 : जिल्ह्यातील ९ लाख २६ हजार ८३१ वाहनांपैकी तब्बल ७ लाख २६ हजार ९१८ वाहने अजूनही एचएसआरपीविना रस्त्यावर धावत आहेत. आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही केवळ २५ टक्के वाहनधारकांनीच ही नंबरप्लेट बसवून घेतली आहे.२०२५ नोकरी अपडेट

अंतिम मुदत – ३० नोव्हेंबर २०२५

वाहनधारकांना एचएसआरपी बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. या तारखेनंतरही ज्यांनी नंबरप्लेट बसविलेली नसेल, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यातील कलम १७७ नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.

अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ तारखेला होणार नगरपंचायत व नगरपरिषदेची निवडणूक. Election Commission PC

दंडाची रचना

पहिल्यांदा एचएसआरपी न बसवल्यास ₹१,००० दंड

पुन्हा उल्लंघन झाल्यास ₹१,५०० दंड

फॅन्सी किंवा बदल केलेल्या नंबरप्लेटवर ₹१०० दंड, पुनरावृत्ती झाल्यास ₹१,५०० पर्यंत दंड

चुकीच्या पद्धतीने लिहिलेल्या किंवा सजावट केलेल्या नंबरप्लेटसाठी पहिल्यांदा ₹५००, पुढे तिप्पट म्हणजे ₹१,५०० पर्यंत दंड

सहा महिन्यांनंतर पुन्हा उल्लंघन झाल्यास प्रक्रिया पुन्हा ₹५०० पासून सुरू होते.

एचएसआरपी का आवश्यक आहे?

अपघात किंवा गुन्ह्यात सामील वाहनांचा मागोवा घेणे सुलभ होते.

चोरी झालेल्या वाहनांचा शोध जलद लागतो.

प्रत्येक वाहनाचा नोंदणीकृत क्रमांक सुरक्षितपणे डेटाबेसमध्ये नोंदवला जातो.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी ही प्लेट अनिवार्य आहे.

लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबरचा हप्ता ‘या’ दिवशी येणार, यादीत नाव पहा… अदिती तटकरेंचे महत्त्वाचे आवाहन.ladki bahin yojana october installment date fix

प्रशासनाचे आवाहन

वाहनधारकांनी मुदतीच्या आत आपली एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी. मुदत संपल्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”

पुढील दिशा

सध्या जिल्ह्यात फक्त २५% वाहनधारकांनी एचएसआरपी बसवली असल्याने, उर्वरित वाहनांसाठी डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता त्वरित प्लेट बसवावी, जेणेकरून दंड आणि गैरसोय टाळता येईल.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment