HSRP Number Plate Last Date:सन २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसविण्यासाठी राज्य परिवहन विभागाने वाहनचालकांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. आता ही मदतवाढ अंतिम असून, एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा खामगावचे ‘आरटीओ’ हेमंत खराबे यांनी दिला आहे.
वाहनांना १ एप्रिल २०१९ पासून ‘एचएसआरपी’ बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरीमुळे होणारे गुन्हे रोखणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसविणे अत्यावश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना e-KYC लाभार्थी यादी जाहीर! नाव कसे तपासावे येथे पहा Ladki Bahin Yojana E-KYC List
जुन्या वाहनांच्याही सध्या वापरात असलेल्या नक्कल किंवा तत्सम दिसणाऱ्या नंबरप्लेट्स बदलण्यासाठी ३० नोव्हेंबरची ‘डेडलाइन’ होती. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने पुन्हा मुदतवाढ दिली असून, आता ३१ डिसेंबरपर्यंत ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र ‘आरटीओं ‘कडून वेट दंडात्मक कारवाईचा उगारण्यात येणार आहे.
‘एचएसआरपी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत
मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सन २०१९ पूर्वीच्या सर्व प्रकारच्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठीची मोहीम सुरू आहे. आता ३१ डिसेंबरची मुदत ही या वाहनधारकांसाठी देण्यात आली आहे. यापूर्वी वाहनांना एचएसआरपी बसविली नाही तर कारवाई होणार आहे.
वायुवेग पथकाकडून होणार कारवाई
विहित मुदतीत एचएसआरपी’ वाहनास बसविली नाही, तर वायुवेग पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
जुन्या वाहनांची संख्या ५०,२७६
खामगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत जुन्या वाहनांची संख्या ५० हजार २७६ एवढी आहे. १४ हजार १५० वाहनांना नंबर प्लेट बसविण्यात आली आहे.
एचएसआरपी नसल्यास काय कारवाई होणार?
जुन्या वाहनांना एचएसआरपी नसल्यास त्यांच्यावर किमान पाच हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली जाणार आहे.
खामगाव कार्यालयांतर्गत नऊ केंद्र कार्यान्वित !
खामगाव कार्यालयांतर्गत एचएसआरपीची नोंदणी व आवश्यक त्या प्रक्रियेसाठी नऊ केंद्र कार्यान्वित आहेत. खामगावातील केंद्र जुना अकोला बायपास रस्त्यावर स्थित आहे. ऑनलाइन नोंदणी करून या केंद्रात संपर्क साधता येणार आहे.
तब्बल पाचव्यांदा मुदत वाढविली!
वेळोवेळी या एचएसआरपी’ नंबरप्लेट बसविण्याच्या मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली. सर्यंत ठिकाणी मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता ही मुदत वाढविण्यात आली; परंतु आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी असून, वाहनधारकांनी दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नंबरप्लेट बसविणे गरजेचे आहे.
नोंदणी, कागदपत्रे, शुल्क अन् प्रक्रिया काय?
यासाठी राज्य परिवहन विभागाच्या वतीने ‘एचएसआरपी’चे अधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले.
त्यावर संबंधित वाहनधारकांना त्याची नोंदणी करता येते. यामध्ये वाहनाचा क्रमांक, आरसी बुक क्रमांक, विविध प्रकारच्या माहितीला भरून अर्ज सादर केल्यावर त्याचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर नंबरप्लेट बसविण्यासाठी निश्चित केलेल्या वेळ आणि तारखेला संबंधित डीलर फिटमेंट सेंटर येथे जाऊन आपल्या वाहनाला ही नंबरप्लेट बसविता येते.
डीएल २६ सीए ०००१
एचआर १४ सीए ००९९
जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविणे बंधनकारक आहे. यापूर्वी मुदवाढ देण्यात आली होती; मात्र ३१ डिसेंबर नंबरप्लेट न बसविणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल.
हेमंत खरावे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, खामगाव