HSRP Number Plate Date extended:विषय :- दि.०१/०४/२०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत.
संदर्भ:- १ या कार्यालयाचे परिपत्रक क्र. ६८/२०२४/पआका/का.११/२०२४/ जा.क्र १४८७९, दि. २३.१२.२०२४.
२ या कार्यालयाचे परिपत्रक क्र १८/२०२५/पआका/का-११/HSRP/२०२५/जाक ३५२५ दिनांक २०.०३.२०२५
दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/०३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्रमांक २ अन्वये ३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसविणे बाकी असल्याने HSRP बसविण्यासाठीची मुदत वाढवून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सबब, या परिपत्रकाद्वारे दि. ०१/०४/२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक १५.०८.२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणा-या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तथापि, दिनांक १५.०८.२०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही..
तरी सर्व सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी/ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा / टॅक्सी बस ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा