Government employee not to cut birthday cake: सरकारी कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्याबाबत ‘महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९’ बाबत शासनाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्याला या नियमाचे उल्लंघन महाग पडू शकते.
अधिकारी, कर्मचारी शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ (वाढदिवस) साजरा करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने परिपत्रक काढून कारवाईचा इशारा दिला.
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) State Governments Employee Important GR
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार कार्यालयात वैयक्तिक समारंभकरता येत नाहीत. शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाढदिवस वा इतर खासगी समारंभ कार्यालयीन वेळेत साजरे केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
एकीकडे संचिकांचे ढीग साचलेले…
अनेक शासकीय कार्यालयांमध्ये संचिका तुंबल्या आहेत. अधिकारी-कर्मचारी मात्र वैयक्तिक समारंभात व्यस्त असल्याचे वारंवार दिसते.
मोठी बातमी राज्यातील सर्व शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर ! School Holiday Announcement
सर्व विभागांना सूचना
महसूल व वनविभागाचे एक परिपत्रक गेल्या आठवड्यात आले आहे. प्रशासनातील सर्व विभागांना ते परिपत्रक पाठवून सूचना दिल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभाग
कार्यालयीन वेळेत केक, स्नॅक्सवर ताव
जमाबंदी आयुक्त कार्यालयात बर्थडे केक, वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालय वेळेत सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने परिपत्रक काढले.
२ केक वाटून सर्व विभागांत ‘सेलिब्रेशन’ करण्यात आले. कार्यालयात वैयक्तिक समारंभ कशासाठी, असा प्रश्न पुढे आला आहे.
अलीकडच्या काळात सोशल मीडियावर मिस्वण्याच्या चमकोगिरीमुळे पब्लिसिटीवीरांना कोणतेही भान राहिलेले नाही. यातून असे प्रकार घडत आहेत.