Government Circular regarding “Appointment to Retirement” of State Employees:नियुक्ती ते सेवानिवृत्ती” (e-HRMS) ही प्रणाली विकसित करण्यासाठी National Informatics Centre Services Incorporation (NICSI) या संस्थेस निधी वितरीत करणेबाबत.
शुध्दीपत्रक :संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद १ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-
“नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या” सेवा प्रदान करण्याकरीता ई गव्हर्नस प्रकल्पातंर्गत मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (eHRMS) विकसित करण्याकरीता National Informatics Centre Services Incorporation (NICSI) या संस्थेस खालील तक्त्यात नमूद रु. ७,४९,४०,१४९/- इतकी रक्कम प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
ऐवजी”नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या” सेवा प्रदान करण्याकरीता ई गव्हर्नस प्रकल्पातंर्गत मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (eHRMS) विकसित करण्याकरीता National Informatics Centre Services Incorporation (NICSI) या संस्थेस खालील तक्त्यात नमूद रु. ७,४९,४०,१४९/- इतकी रक्कम वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/विनियम भाग-२ दि. १७.०४.२०१५ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८ भाग-पहिला, उप विभाग-दोन मधील अ.क्र. ११-अ नियम क्र. ३४ अन्वये अधिदान व लेखा कार्यालयास संक्षिप्त देयकावर प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे, असे वाचण्यात यावे.
२. सदर शासन निर्णयातील परिच्छेद ३ नंतर खालीलप्रमाणे परिच्छेद ३ (अ) अंतर्भूत करण्यात येत आहे :-
सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका, १९७८ शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, दि. १७/४/२०१५ मधील भाग पहिला, उपविभाग दोन मधील अनुक्रमांक २७ (अ) नियम क्र. ७६ नुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०६२५१८१५४७९७०७ असा आहे. सदर शासन शुध्दिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,