मुंबई : Gold rate today आज दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळाले आहे गेल्या आठ दिवसापासून दोनशे रुपयांची घसरण होताना दिसत आज सकाळी सोन्याच्या भावात वाढ झाली असून प्रति दहा ग्रॅम मागे सोन्याच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली आहे. Gold rate today
गेल्या आठ दिवसात सोन्याच्या भावात साधारणता 3800 रुपयांची घसरण झाली. सोन्याच्या भावात कमी होणार की वाढणार ? लग्नसराई सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. लग्नसराईत ग्राहक मोठ्या प्रमाणात सोन्याच्या अंदाजे खरेदी करत असतात अशावेळी सोन्याच्या भावात 100 200 रुपयांचा जरी बदल झाला तरी ग्राहकांना याचा चांगलाच फटका बसतो.
ऐन लग्नसराईत आता सोन्याच्या भावाने वेग पकडला असून सोन्याचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. ग्राहकांच्या मनात आता प्रश्न पडला आहे की सोन्याची खरेदी आत्ताच करावी की नंतर याविषयी बाजार तज्ञांचे काही निर्णय आपण जाणून घेणार आहोत.
सध्या शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळताना आपल्याला दिसून येत आहे दररोज नामांकित कंपन्याचे शेअर घसरत आहेत चांगल्या कंपनीच्या शेअरला देखील लोअर सर्किट लागल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपला पैसा काढल्यामुळे शेअर मोठ्या प्रमाणात घसरताना आपल्याला दिसत आहे. Gold rate today
चला तर आज आपण सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
सोन्याच्या भविष्यातील भाव काय राहणार याची सोपी ट्रिक
जर तुम्हाला आठवडाभरात होण्याचे दर काय राहतील याविषयी जर माहिती करून घ्यायचे असेल तर तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. येणाऱ्या दोन-तीन दिवसात सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार याविषयी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय आणि भारतीय शेअर मार्केटवर लक्ष द्यायला हवे. जर शेअर मार्केट कोसळले तर पुढील एक-दोन दिवसात सोन्याचे भाव शंभर टक्के वाढणार कारण की अनेक मोठाले गुंतवणूकदार शेअर मार्केट मधून आपला पैसा काढल्यानंतर हा पैसा सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात यामुळे सोन्याच्या भावात वाढ होण्याची दाट शक्यता असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी शेअर बाजार सुसाट वेगाने पळत असतो अशावेळी सोन्याचे भाव कमी होत असतात त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवलेला पैसा शेअर मार्केटमध्ये बाजारामध्ये लावत असतात. त्यामुळे साहजिकच सोन्याच्या भावात बदल होतो आणि सोन्याच्या किमती कमी होतात.
Cotton Rate Today कापसाचे भाव वाढणार की कमी होणार ? काय आहे बाजाराची स्थिती..?
येणाऱ्या दिवसात काय असतील सोन्याचे बाजार भाव. Gold rate today
शेअर बाजारात झालेल्या नुकसानीचा परतावा घेण्यासाठी गुंतवणूकदार शेअर बाजार कोसळल्यानंतर आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवणूक करतात आणि आपला झालेला तोटा भरून काढतात. यामुळे शेअर बाजारात पडल्यानंतर सोन्याचे भाव वाढण्याचे आजपर्यंतचा इतिहास आहे. सध्या शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळताना आपल्याला दिसून येत आहे वर सांगितल्याप्रमाणे शेअर बाजार कोसळल्यावर गुंतवणूकदार आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवत असतात त्यामुळे सोन्याच्या भावात तेजी राहील आणि सोन्याचे भाव वाढतील याची दाट शक्यता राहणार आहे. जे ग्राहक शुभकार्यासाठी सोने खरेदी करायचा विचार करत असतील अशा ग्राहकांना सध्या सोने खरेदी करायची संधी आहे.
येणाऱ्या आठ-दहा दिवसात आपल्याला सोन्याचे भाव हे वाढलेले पाहावयास मिळतील. लग्नसराईसाठी सोन खरेदी करण्याची ही संधी ग्राहकांपुढे आहे.
भारतीय बाजारातील आजचे सोन्याचे भाव.
आजचे 22 कॅरेट सोन्याचे बाजार भाव..
ग्राम | 22 कॅरेट आजचा सोन्याचा भाव |
22 कॅरेट कालचा सोन्याचा भाव |
1 ग्राम | ₹ 7,145 | ₹₹ 7,115 |
8 ग्राम | ₹ 57,160 | ₹ 56 ,920 |
10 ग्राम | ₹ 71,450 | ₹ 71,150 |
100 ग्राम | ₹ 7, 14,500 | ₹ 7,11,500 |
सोन्याच्या भावात दहा ग्राम मध्ये आज 300 रुपयांची वाढ झाली ही वाढ येणाऱ्या दिवसात कायम राहील आणि सोन्याच्या भावात येणाऱ्या दिवसात वाढ होईल.
Gold rate today आजचे 24 कॅरेट सोन्याचे बाजार भाव..
ग्राम | 24 कॅरेट आजचा सोन्याचा भाव |
24 कॅरेट कालचा सोन्याचा भाव |
1 ग्राम | ₹ 7,795 | ₹ 7,762 |
8 ग्राम | ₹ 62,360 | ₹ 62,096 |
10 ग्राम | ₹ 77,950 | ₹ 77,620 |
100 ग्राम | ₹ 7,79,500 | ₹ 7,76,200 |
24 कॅरेट सोन्याच्या भावात आज 330 रुपयांची वाढ झाली असून ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे येणाऱ्या दिवसात सोन्याच्या भावात चांगली वाढ होईल.
टीप :- वरील माहिती बाजार तज्ञांच्या सल्ल्यानुसार आहे प्रत्यक्ष गुंतवणूक करताना ग्राहकांनी आर्थिक तज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.