Ganpati Festival Toll free Pass:आगामी सन-२०२५ च्या गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सव निमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यास अनुसरुन सर्व संबंधितांना या परिपत्रकाद्वारे पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे.
१. सन २०२५ च्या गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने दि. २३/०८/२०२५ ते दि.०८/०९/२०२५ या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम-६६) वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणा-या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सवलत देण्यात येत आहे.
अ) याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे गणेशोत्सव २०२५, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नांव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स (पासेसचा नमुना सोबतचे जोडपत्र अ प्रमाणे) आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.
ब) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसेस व इतर वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत तेथील पोलीस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांचेकडे पासेस वरील “अ” प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येतील.
संबंधित जिल्हयातून गौरी-गणपती वाहतूकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसना पथकर माफी असलेले पासेस संबंधित वाहनांस लावून/चिकटवून सदरच्या बसेस रवाना होतील.
२. ग्रामीण वा शहरी पोलीस / प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेमार्फत दिल्या जाणाऱ्या पासेसची संख्या बाबतीत एकत्रित माहिती उप सचिव (खा.र.१), सार्वजनिक बांधकाम विभाग, ४ था मजला, मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीकरिता सादर करावी.
३. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरीता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना / जाहीरात प्रसिध्द करावी.
उपरोक्त सुचना सर्व संबंधित अधिका-यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८२११७३४३७५२१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेत 8 नवीन नियम: या महिलांचे पैसे बंद होणार, यादीत पहा Ladki Bahin Yojana list
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.