Farmer Loan waiver Update 2025:सरकारने संभाव्य कर्जमाफीच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नुकतेच पत्र पाठवले आहे. अप्पर आयुक्त (विशेष निबंधक सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड (पुणे) यांच्या सहीने हे पत्र जिल्हा बँकांना पोहोचले आहे.
राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासनाने मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली आहे.
बँकांनी अनेक्क्षर ए आणि बी ची माहिती तयार करून ठेवावी, असे या पत्रात नमूद केले तीन लाख ३६ हजार ४०६ कर्जदार शेतकरी अग्रणी बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात तीन लाख ३६ हजार ४०६ कर्जदार शेतकरी आहेत.
त्यांच्याकडे ३८०२ कोटी ८८ लाख रु. कर्ज आहे. यात एन. पी अकाउंट १ लाख ३९ हजार ८३९ इतके असून, २८३९ कोटी ३९ लाख थकलेले आहेत.
आहे. या अनेक्क्षर ए व बी मध्ये आता सुधारणा करण्यात आली असून, त्याचे नमुने पत्रासोबत जोडण्यात आले आहेत. सुधारित नमुन्यातील माहिती तयार करून ठेवण्यात यावी व महाआयटीकडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर ती पोर्टलवर भरण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना पत्राद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा म. स. बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले की, होय, बँकेला असे पत्र मिळाले आहे. माहिती अद्ययावत करण्याचे कामही चालू झाले आहे.